मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा: डीवायएफआयचा आंदोलनाचा इशारा
अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरात व परिसरात मोकाट कुत्र्यांची होत असलेली वाढ ही शहरातल्या नागरिकांसाठी खूप मोठी समस्या झाली. याबाबत डीवायएफआय संघटनेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. नागरिकांनी नगर पालिकेला अनेकवेळा कळवण्यात आलेले आहे. परंतु पालिकेने यावर कोणतही कार्यवाही केलेली नाही. या कडे पालिकेने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अन्यथा संघटेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
शहरातील विविध भागात मोकाट भटकणार्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणार्या कुत्र्यामुळे अंबाजोगाई मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचारी कामगारांवर ही मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याने शहरात प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे. अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे व निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी डीवायएफआय संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा घटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
“””””””””””””””””
निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त बाबत पालिकेने काय केले?
निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करण्यासाठी नगर पालिकेने आतापर्यंत काय उपाय योजना केली. यासाठी किती पैसे खर्च केले? किंवा निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करण्यासाठी पैसे नाहीत. ज्यामुळे मोकाट कुत्र्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचे उत्तर पालिका प्रशासनाने द्यावे.
“””””””””””””
अंबाजोगाई शहरातील भटक्या कुत्र्यांवर नगर परिषदेने योग्य ती कारवाई करावी.जेणेकरून मोकाट कुत्रे नागरिकांना त्रास देणार नाहीत. एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला व त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे. जेणेकरून कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. अंबाजोगाई नगर परिषदेने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.
*सुहास चंदनशिव*
डीवायएफआय जिल्हाउपाध्यक्ष