१३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–: शेपवाडी परिसरातील हॉटेल उमेश बिअर बार मध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ११ जणांना अटक के यावेळी एकूण १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेपवाडी परिसरातील उमेश बिअर बार येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहीत शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे संध्याकाळी ७.३० वाजता शहर पोलिसांच्या पथकाने बार वरील वरच्या मजल्यावर छापा टाकला.
यावेळी पोलिसांना तेथे काही इसम गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून नगदी रक्कम, विविध प्रकारचे मोबाईल फोन्स आणि स्कॉर्पिओ वाहन असा एकूण सुमारे १३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये रविशंकर मुंडे (वरवटी), धनराज फड (कन्हेरवाडी), कुलदीप शेप, नितीन शेप, विराज काटकर, आप्पाराव लाड, किशोर उंदरे, धनराज चाटे, अमोल पाचंगे, सतीश शेप, प्रदीप शेप (सर्व अंबाजोगाई व परळी परिसरातील यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अपर अधीक्षक चेतना तिडके, उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनि आनंद शिंदे आणि पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, श्रीकृष्ण वडकर, दत्तात्रय इंगळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, रविकुमार केंद्रे, प्रविणकुमार गित्ते, भागवत नागरगोजे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.