केज: – केज (अनु. जाती.) विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणूकीत २५ उमेदवार राहीले असून अर्ज माघार घेण्याच्या सोमवार (दि.४) या शेवटच्या दिवसा पर्यंत माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांच्यासह १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात २५ उमेदवार राहीले आहेत. यामुळे खरी लढत भाजपाच्या विद्यमान आ.नमीता मुंदडा व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी चे (शरदचंद्र पवार) उमेदवार माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्यात होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
मागील ४५ वर्षापासून अनुसुचीत जातीसाठी राखी असलेल्या केज विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी ४७ उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज भरले होते. अर्ज छाननीत ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ४३ उमेदवार राहीले होते. अर्ज मागे घेण्याच्या सोमवार (दि. ४) या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात २५ उमेदवार राहीले असल्याची माहिती सह्याक निवडणूक निर्णय अधिकारी विलास तरंगे यांनी दिली.
१८ उमेदवारांनी मागे घेतले अर्ज
प्रा. सौ. संगीता विजयप्रकाश ठोंबरे, जयश्री पृथ्वीराज साठे, सीता बनसोड, ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, विशाल नवनाथ मस्के, विकास रामभाऊ काळुंके, सिध्दार्थ शिनगारे या ७ प्रमुख उमेदवारांसह इतर ११ अशा १८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
निवडणूकीच्या रिंगणात २५ उमेदवार
केज विधानसभेच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज वापस घेण्याची मुदत संपल्यानंतर या 25 उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे. त्यामध्ये पृथ्वीराज शिवाजी साठे- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, नमिता अक्षय मुंदडा- भारतीय जनता पार्टी, अनंत वैजनाथ गायकवाड-बहुजन समाज पार्टी, रमेश रघुनाथ गालफाडे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अलका प्रभाकर साळुंके- टीपू सुलतान पार्टी, अशोक धोंडीबा सोनवणे- भारतीय युवा जन एकता पार्टी, अशोक भागोजी थोरात-बहुजन महा पार्टी, अशोक लक्ष्मण इचके- राष्ट्रीय मराठा पार्टी, जीवन श्रीपती गायकवाड- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, शितल महादेव रोकडे- राष्ट्रीय समाज पक्ष, साहस पंढरीनाथ आदोडे- मराठवाडा मुक्ती मोर्चा, आशिष अशोक भालेराव- अपक्ष, जयश्री गोरख वाघमारे- अपक्ष, महाविर धर्मराज सोनवणे- अपक्ष, मीलींद दगडू आचार्य- अपक्ष, लहु महादेव बनसोडे- अपक्ष, विजयकुमार सुखदे वाव्हळ- अपक्ष, विशाल घनशाम घोबाळे- अपक्ष वैभव विवेक स्वामी- अपक्ष, शिरीष मिलिंदराव कांबळे-अपक्ष, सचिन भिमराव चव्हाण- अपक्ष, सतिष सुदाम पायाळ- अपक्ष, संजय पंढरीनाथ साळवे- अपक्ष, संजय बाबुराव होळकर- अपक्ष व स्वप्नील बब्रुवाहन ओव्हाळ- अपक्ष या २५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.