पालकमंत्री धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा; शासन निर्णय निर्गमित
मुंबई (दि. 09) – बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथ सह अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव, वडवणी, बीड पाटोदा व शिरूर कासार या तालुक्यातील 15 प्रमुख रस्त्यांना त्यांची दर्जा उन्नती करून राज्य मार्गाचा दर्जा देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित केला असून, जिल्ह्यातील शेकडो किलोमीटर चे 15 प्रमुख रस्ते चकाचक होणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.
धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग अशा 15 रस्त्यांची राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला होता, त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून, याबाबतचे दोन शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे यासाठी आभार मानले आहेत.
हे रस्ते होणार आता राज्य मार्ग
परळी तालुक्यातील मालेवाडी हाळम ते नागदरा ते राज्य मार्ग 548 (लांबी 23 किमी), राज्यमार्ग 548 ते जोडवाडी धसवाडी उजनी भतानवाडी, बाभळगाव भवानवाडी पट्टीवडगाव पिंपरी चंदनवाडी तांदुळवाडी लिमगाव (लांबी 29 किमी), दैठणा घाट हाळम दौंडवाडी घाटनांदुर चोथेवाडी, लिंबगाव बर्दापूर लांबी (43 किमी), मुरंबी नवाबवाडी घाटनांदुर ते राज्य मार्ग 548 (लांबी 10 किमी), जिजिमा 93 सायगाव भारत जवळगाव गिरवली बावणे ते राज्य मार्ग 548 ब (लांबी 25 किमी), नथरा इंजेगाव राज्य मार्ग 548 ब देशमुख टाकळी पांगरी नागापूर साकुड अंबाजोगाई ते राज्य मार्ग 235 (लांबी 33 किमी) त्याचबरोबर राज्य मार्ग 361 टोकवाडी नागापूर मांडेखेल नागपिंपरी, बोधेगाव कावळेवाडी म्हातारगाव कान्नापूर हिंगणी कासारी बोडका कारीमार्गे उपळी (लांबी 50 किमी), प्रतिमा बावन बोधेगाव राक्षस वाडी चिचखंडी भावठाणा धावडी डोंगरपिंपळा सनई मोरेवाडी राज्यमार्ग 56 ते अंबाजोगाई गीता जवळगाव लिमगाव हातोला ते प्रतिमा 57 (लांबी 48 किमी), प्रतिमा 18 ते धनेगाव नायगाव सौंदना इस्थळ आपेगाव धानोरा देवळा राज्य मार्ग 211 ते धानोरा बुद्रुक मुडेगाव नांदगाव बर्दापूर तळेगाव निरपणा उजनी ते राज्य मार्ग 548 ड (लांबी 68 किमी), राज्य मार्ग 61 ते खरात आडगाव टाकळी आनंदगाव राज्य मार्ग 361 दिंद्रुड आडस होळ बोरी सावरगाव ते बनसारोळा इस्थळ ते बीड जिल्हा हद्द (लांबी 70 किमी), राज्यमार्ग 55 ते परडी माटेगाव चिंचाळा कुप्पा राज्यमार्ग 361 ते उपळी गावंदरा काटेवाडी भोगलवाडी पिंपळवाडी असोला आवरगाव ते राज्य मार्ग 232 (लांबी 38 किमी), देवगाव विडा सिंधी फाटा येवता कोळवाडी तरनळी ते राज्य मार्ग ५४८ सी धारूर असोला अंजनडोह ते मुरळी राज्यमार्ग 211 (लांबी 45 किमी), डोंगर किनी ते वंजारवाडी रायमोहा खालापुरी साक्षाळ पिंपरी शिरस मार्ग कामखेडा माळापुरी कुर्ला कुक्कडगाव नाथापूर रंजेगाव ते पिंपरखेडा वडवणी चिखल बीड जिवाचीवाडी लहरी कानडी माळी सोनेगावला आनंदगाव ते पैठण राज्य मार्ग रस्ता 64 (लांबी 145 किमी), राज्य मार्ग 222 ते दहिफळ वडमावली देवगाव शिरूर घाट पट्टी घाट ते प्रतिमा 40 बीड जिल्हा हद्द (लांबी 40 किमी) आणि राज्यमार्ग 61 पवारवाडी ते मोगरा डिग्रस पोहनेर कासारवाडी कोडगाव हुडा ते राज्यमार्ग 235 (लांबी 29 किमी) या 15 रस्त्यांची दर्जोन्नती होणार असून या रस्त्यांचे स्वरूप आता पालटणार आहे.