अंबाजोगाई:-आई राजा उदो उदो योगेश्वरी देवीचा उदो उदो या जयघोषात महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या योगेश्वरी मंदीरात घटस्थापना झाल्यानंतर ह्या शारदीय नवरात्र महोत्सवात मोठ्या भक्तीभावाने लाखो भाविक योगेश्वरीच्या दर्शनासाठी रात्रंदिवस गर्दी करीत आहेत.
रात्री मंदीर परिसर आकर्षक पद्धतीने केलेल्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून विद्युत रोषणाईने सजलेले मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे योगेश्वरी मातेच्या नवरात्र महोत्सवास मोठी परंपरा असून थाटामाटात देवल कमिटी संचालक, मानकरी,प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली त्यानंतर त्या दिवशीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर भजन, कीर्तन,प्रवचन,पूजा विधी मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. दिवसभर लाखो भाविक भक्तीभावाने देवी समोर नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत.अनेक तरुण देवीच्या जयघोषात श्रीफळ बांधण्यासाठी गर्दी करत आहेत दिवसेंदिवस भाविकांच्या रांगा वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहेत. सकाळी अभिषेक, देवीची नित्योपचार पूजा संपन्न झाल्यानंतर सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागतात सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात असून जागोजागी पोलीस पहारा आणि नाकेबंदी करण्यात आलेली आहे दर्शनासाठी महिला, पुरुष यांची मोठी गर्दी होत आहे मात्र मंदीरास येण्या जाण्यासाठीच्या रस्त्यावर अतिक्रमण असल्याने या भागात पायी चालण्यासाठी किंवा वाहनांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे याकडे संबधित प्रशासनाने लक्ष देण्याची भाविकांतून मागणी होत आहे.