स्पर्धेतील विजेत्यांना लाखोंची बक्षीसे
अंबाजोगाई -: भगवान महाविर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन अंबाजोगाई तालुक्यासाठी 30 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक शाळांमधून होणार आहे. या निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भगवान महावीर 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्हास्तरावर करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यात ही स्पर्धा दि.30 सप्टेंबर प्रत्येक शाळेत शालेय वेळेतच होणार आहेत. भगवान महावीर यांचे जीवन सिद्धांत व संदेश यावर आधारीत ही स्पर्धा आहे. भगवान महावीरांचे जीवन कार्य यावर आयोजित या स्पर्धेसाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. शासनाने ही स्पर्धा सर्वत्र आयोजित केली आहे. अंबाजोगाई तालुक्यात होणार्या स्पर्धेत सर्वशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन बीड शासकीय जिल्हा समिती सदस्य रक्षा धनराज सोळंकी, हितेश बलदोटा, अशोक लोढा, अशिष जैन, शैलेश कंगळे यांनी केले आहे. तर या निबंध स्पर्धेसाठी लागणार्या उत्तर पत्रिकांची सुविधा सामाजिक कार्यकर्ते धनराज सोळंकी यांनी केली आहे. या उत्तर पत्रिका प्राप्त करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक यांचे पत्र घेऊन शाळेतील प्रमुखांनी 9107891008, 9422242326 ,9356623592 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.