अंबाजोगाई प्रतिनिधी :-अंबाजोगाई तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य घटकाला त्याचे जीवन सार्थकी लावता यावे व त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करता यावे यासाठी अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही जरीया (माध्यम) म्हणून काम करते आहे. या पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. लोकनेते स्व. विलासराव देशमुख सभागृह, नगर परिषद अंबाजोगाई येथे होणार असून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक व स्नेहीजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन शेख उमर फारूक यांनी केले आहे.
. अंबाजोगाई शहरात सन 2004 साली अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही अल्पशा भाग भांडवलावर सुरू झाली. या संस्थेने केवळ मदत आणि सहकार्य हीच भूमिका घेतलेली आहे.व्यवहार, व्याज,अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही. उलट कर्जदारास या ठिकाणी मानवतेचा दिलासा देण्याचे काम केले जाते. या पतसंस्थेने वीस वर्षात गरुड झेप घेतली असून या पतसंस्थेला ग्राहकांना ग्राहक मानले जात नसून परिवारातील सदस्य मानले जाते . पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी पार पडत आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमीर- ए – जमातचे शेख फरकुंद अली हबीब अली, अंबाजोगाई येथील शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर शामराव सुवर्णकार, लातूर हार्डवेअरचे मुजाहिद आयुब कुरेशी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव जोगदंड, रुई धारूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद नजीरोद्दीन सरफराजोद्दीन (डॉ.नविद )यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या सर्वसाधारण सभेस अंबाजोगाई तालुक्यातील सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन शेख उमर फारूक,व्हाईस चेअरमन खतीब मोहम्मद मुजमील, सचिव शेख तालेब चाऊस व सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्ग कर्मचारीवृंद यांनी केले आहे.