श्री.संत सेना महाराजांनी समतेचा विचार मांडला – आमदार सौ.नमिताताई मुंदडा
अंबाजोगाई प्रतिनिधी:- श्री संत सेना महाराज यांच्या ६२६ व्या पुण्यतिथीनिमित्त अंबाजोगाई येथे बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रींचा अभिषेक व महापुजा, महाआरती, किर्तन, भक्तीगीत गायन आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ भाविक भक्त, सर्व समाज बांधवांनी घेतला.
संत सेना महाराज प्रतिष्ठान व नाभिक एकता महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या पुण्यतिथी सोहळा शहरातील श्री संत सेना महाराज व श्री संत नरहरी महाराज मंदिर, मुकुंदराज रोड, अंबाजोगाई येथे बुधवार, दि.२० ऑगस्ट रोजी श्रींचा अभिषेक व महापुजा, महाआरती, किर्तन, भक्तीगीत गायन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ७ ते ९ वाजता या वेळेत श्रीहरी (मामा) गवळी व माणिकराव (मामा) राऊत, विष्णु कचरे, पांडुरंग कचरे, बालाजी गोरे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजता या वेळेत ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड (श्री.जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपुर) यांची किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी आपल्या सुश्राव्य किर्तनातून ह.भ.प.चलवाड यांनी संत सेना महाराज यांच्या संपूर्ण अध्यात्मिक जीवनावर आपल्या प्रवचनातून पांडुरंग व सेना महाराज यांच्या भक्ती बद्दल सांगितले संत सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत होते. जन्म राजस्थानात झाला. परंतु, महाराष्ट्रात आल्यानंतर वारकरी संप्रदायाचे ते एक भाग बनले. त्यांचे अनेक अभंग, व चरित्रात्मक माहिती याबाबत अनेक संतांच्या अभंगातून समाजासमोर आलेले दिसून येते. असे विचार व्यक्त केले. तर केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणेच संत सेना महाराजांना ही श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जातात. सेना महाराजांनी हजारो अभंगांची निर्मिती करून ‘सैनपंथ’ नांवाची चळवळ भारतात सुरू केली. हीच चळवळ आज महाराष्ट्रात वारकरी चळवळ म्हणून प्रसिद्ध आहे. संत सेना महाराजांनी समतेचा विचार मांडला असे गौरवोद्गार आमदार सौ.मुंदडा यांनी काढले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, बापूसाहेब टाक, हनुमंत दहिवाळ, बबन दहिवाळ, राजेश पंडित, ऍड.किशोर गिरवलकर, कालिदास मैड, हिंदुलाल काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, ऍड.दिलीप चामनर, अनंत अरसुळे आदींची उपस्थिती होती. किर्तन व भजनाचे मानकरी प्रा.विजयकुमार बिदरकर, भिमराव बाबुराव कचरे हे होते. त्यानंतर दुपारी १२ ते दुपारी २ वाजता या वेळेत सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप व संच यांचा भक्तीगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाभिक महामंडळाचे संघटक कविराज कचरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे स्थानिक अध्यक्ष डॉ.केशवराव राऊत आणि नवनाथ राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री संत सेना महाराज प्रतिष्ठाण, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, अंबाजोगाईचे अध्यक्ष मधुकर सुरवसे, जिवराज गवळी, भिमराव कचरे, परमेश्वर गवळी, अजिंक्य राऊत, संतोष गवळी, राजकुमार जाधव, संभाजी राऊत, अभिराज गवळी, नरसिंग वाटकर, ज्येष्ठ मार्गदर्शक माणिकराव हारणे, निवृत्तीराव कचरे, गोविंद कचरे, प्रा.बिदरकर सर, सौदागर काळे, डिगांबर माने यांच्यासह सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेतला होता.