ऑल इंडिया पँथर सेनेच्या मराठवाडा युवक अध्यक्षपदी अमोल वाघमारे
अंबाजोगाई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने उदयास येत असलेल्या ऑल इंडिया पँथर सेनेच्या मराठवाडा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई येथील युवा नेते तथा सामाजिक चळवळीमध्ये सक्रीय असणारे व्यक्तीमत्व अमोल वाघमारे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात ऑल इंडिया पँथर सेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या आढावा बैठकीला दीपकभाई केदार,बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन भोळे,युवक प्रदेशाध्यक्ष बंटी शिंदे व ऑल इंडिया पँथर सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.ऑल इंडिया पँथर सेनेच्या मराठवाडा युवकच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अमोल वाघमारे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.