२.० अंतर्गत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू
अंबाजोगाई प्रतिनिधी:- केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा प्रक्रिया सुरू करण्यात आला आहेे. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नवीन घरकुल मंजुरीसाठी अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदीं यांनी केले आहे.केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा प्रक्रिया सुरू करण्यात आला आहेे. यासाठी केंद्र सरकारकडून निधीही मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेकरीता नागरिकांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर याची पडताळणी होऊन मंजुरी देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना मध्ये लाभार्थ्यास चार टप्प्यात अडीच लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.
अंबाजोगाई शहर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नवीन घरकूल मंजुरीसाठी https://pmay-urban.gov.in या वेबसाइटवर नजीकच्या सेतु केंद्रावर अर्ज करावे. नवीन घरकूल मंजुरीसाठी अर्जदाराचा आधार लिकं मोबाईल नंबर, आधार कार्ड (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख), कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख), अर्जदाराचे आधारला लिंक असेलेले सक्रिय बँक खाते तपशील (खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, आयएफएससी कोड), उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र (एससी,एसटी किंवा ओबीसी बाबतीत), जमीन दस्तऐवज (पी.टी.आर. खरेदीखत, सद्यस्थितीत असलेल्या घराचा फोटो, घटक क्र.१चे प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले अशा सर्व कागदपत्रांच्या (ओरिजनल) मूळ प्रती वेबसाइटवर अपलोड कराव्यात व पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदीं यांनी केले आहे.
Online अर्ज भरण्याकरिता QR code स्कॅन करावा