अंबाजोगाईतील घटना, सर्व आरोपी अल्पवयीन
अंबाजोगाई प्रतिनिधी:- दिवसभराचे कामकाज आटोपून घराकडे निघालेल्या सुजित श्रीकृष्ण सोनी या तरुण व्यापाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून सोन्याची अंगठी आणि मोबाईल लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री अंबाजोगाई शहरात घडली होती. या हल्लेखोरांना २४ तासात ताब्यात घेण्यात अंबाजोगाई शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ही सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.
सुजित सोनी यांची नगर परिषद परिसरात कोलगेट सह अन्य कंपन्यांची एजन्सी आहे. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कामकाज आटोपून घराकडे जात असताना यशवंतराव चव्हाण चौकातील नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या हॉटेल कोकीताच्या मागील बाजूस तीन दुचाकीहून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी सुजित यांची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आन पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुजित यांनी स्वतःच्या दुचाकीवरून खाजगी रुग्णालय गाठले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आणि वाय्पारी वर्गात भीतीचे वातावरणा पसरले. आधीच संवेदनशील झालेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले.
नोकरानेच दिली टीप
या प्रकरणी शहर पोलिसात कलम 311, 3 (5) नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासाला सुरुवात केली. अवघ्या २४ तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी एक आरोपी सोनी यांच्याकडेच कामाला होता. त्यानेच सुजित यांच्याबाबत टीप साथीदारांना दिली अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीन नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके पोलिस निरक्षक उस्मान शेख यांच्या विशेष मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक विनोद घोळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुतळे, पोहेकॉ मारूती कांबळे, सचिन सानप, राजु पठाण, नितीन वडमारे, शहर पोलीस स्टेशनचे स पो उ नी कांबळे, स पो नी निंलगेकर, पो हे को आवले, कॉ नागरगोजे, चादर, काळे यांनी केली.