केज मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारात सक्रिय
अंबाजोगाई:-केज विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघा दहा दिवसांचा कालावधी उरलेला असतांनाच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी मतदार संघातील आपल्या समर्थकांना प्रचारात सक्रिय केले आहे. मी उमेदवार आहे असे समजून आ.नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी काम करा असे आवाहन आ.पंकजाताई मुंडे यांनी सर्व भाजपा कार्यकर्ते व समर्थकांना केले आहे.
आ.पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाईत भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, संतोष हांगे, रमाकांत बापू मुंडे, राणा डोईफोडे, विष्णू घुले, विजयकांत मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेऊन या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी आपली शक्ती आ.नमिता मुंदडा यांना विधानसभेत पाठविण्यासाठी वापरावी असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुक मतदानाचा दिवस जस-जसा जवळ येत चालला आहे तस-तशी मतदारसंघात आ.मुंदडा यांना पाठिंबा वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचारात सक्रिय नसलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आ.पंकजाताई यांनी आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारात सक्रिय करून विजयासाठी योग्य पध्दतीने नियोजन लावले आहे. केज विधानसभा मतदारसंघात मात्र निवडणुकीपूर्वी मतदानाला काही दिवस शिल्लक असतांनाच केज शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांची बैठक भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी स्वतःच्या उपस्थितीत घेवून या कार्यकर्त्यांचे सर्व म्हणने ऐकुण घेवून त्यांना भाजपाच्या अधिकृत उमेदवार आ.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारयंत्रणेत सहभागी करून होऊन नमिताताई यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले. भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी केज शहर व परिसरातील कार्यकर्त्यांची ही महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ.पंकजाताई मुंडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना केज विधानसभा मतदारसंघामध्ये मु उमेदवार आहे असे गृहीत धरून तन-मन-धनाने कामाला लागा अशा सूचना करताच या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आ. पंकजाताई मुंडे यांना “ताई तुम्हाला केज विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदल केल्याशिवाय आम्ही तुम्हाला भेटणार नाही असे.” अभिवचन दिले. आ.पंकजाताई मुंडे यांनी आणखीन काही प्रमुख कार्यकर्त्यांना बंद दाराआड चर्चा करून सर्वांना सक्रिय करणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांत नवचैतन्य आल्याची चर्चा होत आहे. केज मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.