सर्वसामान्य माणूस म्हणतोय आ.नमिता मुंदडा या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी
केज प्रतिनिधी:-केज मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून आरोप करीत आहेत. पंरतू, केज मतदारसंघातील जनता ही फार सुज्ञ आहे. मत विकासाला द्यायचे की, पाच वर्षांत फक्त निवडणुकीपुरते मतदारांसामोर जाणारांना द्यायचे हे जनतेला सांगायची गरज नाही. कारण, सर्वांगिण विकास काय असतो हे आ.नमिता मुंदडा यांनी केज मतदारसंघाला दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणतोय की, आ.नमिता मुंदडा या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही विरोधकांच्या खोट्या प्रचाराला व भुलथापांना बळी पडणार नाही ; तर आमचे अमुल्य मत हे नमिताताई यांनाच देणार आहोत.
आमदार सौ.नमिता मुंदडा यांनी विधिमंडळ अधिवेशन काळात आपल्या तान्हुल्या बाळाला सोबत घेऊन उपस्थित राहून केज विधानसभा मतदारसंघाचे विविध विकासाचे प्रश्न तिथे पोटतिडकीने मांडले आहेत, सर्व प्रश्नांची सोडवणूक ही केली आहे. तसेच केज मतदारसंघासाठी कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर करून आणला आहे. एवढेच नव्हे तर आठ महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्यांनी विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी येथे कोणीच नसल्याने त्यांनी मुले मुंबई येथेच ठेवली होती. विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम, लोकांच्या अडीअडचणी असल्या की, त्या मतदारसंघात आणि थोडासा मोकळा वेळा मिळाला की, मुंबईत मुलांकडे धाव घ्यायच्या अशा दुहेरी पालकत्वाची जबाबदारी आ.नमिताताई यांनी पार पाडली आहे. त्यासोबतच, लोकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत वेळोवेळी आवाज ही उठवला आहे. त्यामुळेच की, काय आ.नमिताताई सध्या केज मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकदा त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. तरी देखील एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आ.मुंदडा या सातत्यपूर्ण कार्य करीत आहेत. ‘मतदारसंघाने निवडून दिल्यामुळे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया आ.नमिताताई मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. सध्या केज मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून आरोप करीत आहेत. पंरतू, केज मतदारसंघातील जनता ही फार सुज्ञ आहे. मत विकासाला द्यायचे की, पाच वर्षांत फक्त निवडणुकीपुरते मतदारांसामोर जाणारांना द्यायचे हे जनतेला सांगायची गरज नाही. कारण, सर्वांगिण विकास काय असतो हे आ.नमिता मुंदडा यांनी केज मतदारसंघाला दाखवून दिले आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस म्हणतोय की, आ.नमिता मुंदडा या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही विरोधकांच्या खोट्या प्रचाराला व भुलथापांना बळी पडणार नाही ; तर आमचे अमुल्य मत हे नमिताताई यांनाच देणार आहोत.