जनतेच्या समस्या, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न – आ.नमिता मुंदडा
अंबाजोगाई (प्रतिनिधी:- केज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देणे, रस्ते, पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सेवेसाठी माझ्या परिवारातील ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा सदैव जनतेसाठी वेळोवेळी उपलब्ध असतात यापुढील काळात ही जनतेच्या समस्या, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माझे प्रामाणीक प्रयत्न सुरू राहतील. असे मत नमिताताई मुंदडा यांनी जनतेशी संवाद साधतनां मांडले.
केज विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने गुरूवारी सायंकाळी हिवरा, सोमनाथ बोरगाव, धानोरा, तट बोरगाव, आपेगाव या गावांना भेटी देत मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. केज विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांना रस्ते, पाणी यांच्यासह मूलभूत सोयी सुविधा देऊन विकास प्रक्रिया वेगवान करण्याचा आम्हां सर्वांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला महायुती सरकारला मतदान करण्याचे आवाहन या निमित्ताने उपस्थित ग्रामस्थांना केले. याप्रसंगी हिवरा, सोमनाथ बोरगाव, धानोरा, तट बोरगाव, आपेगाव येथील तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते. महायुती सत्तेत आल्यानंतर या निधीमध्ये आणखी वाढ झाली आणि विकास कामांची गती वाढली. याकामी त्यांना लोकप्रिय नेत्या आ.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचा आशीर्वाद आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांचे मार्गदर्शन व जनतेचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे. मतदारसंघातील लोकांच्या विकास कामांसोबतच त्यांच्या वैयक्तिक अडी अडचणीला मदत करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याने त्या लोकप्रिय आमदार झाल्या आहेत. आ.नमिताताई यांनी शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी केज मतदारसंघातील…..यासह विविध गावांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी पाच वर्षांत जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्या बदल्यात मी तुमचे अमुल्य मत पुढील पाच वर्षे ही अशीच सेवा माझ्या माध्यमातून करण्यासाठी मी आपले आशीर्वाद मागत आहे आणि तुम्ही ते दयाल असा मला विश्वास आहे. जनेतेसाठी मुंदडा परिवार अहोरात्र उपलब्ध आहे. मागील सत्तावीस वर्षे स्वर्गीय डॉ.सौ.विमलताई मुंदडा यांनी केज मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्याचे काम केले आहे. आणि त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी तुमची खंभीर साथ असीच राहू द्या व मला मतदानरूपी आशीर्वाद द्या. असे आवाहन आ.नमिता मुंदडा यांनी केले आहे.