सुनियोजित विकास हाच आमचा अजेंडा
अंबाजोगाई प्रतिनिधी:-केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू आहेत.केज मतदारसंघाचा सुनियोजित विकास हाच आमचा अजेंडा आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सायंकाळी मतदारसंघातील लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी माकेगाव ,वरपगाव या गावांना भेटी देत, मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला यावेळी लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी माकेगाव, वरपगाव येथील तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा.सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.
मतदारसंघाचा कायापालट होणार
राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केज विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे.यातून अनेक कामे झाली आहेत. बरीच कामे सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लागतील. केज विधानसभा मतदार संघातील केज, अंबाजोगाई शहर व परिसराचा तसेच गाव खेड्यांचा विकासकामांतून कायापालट केला जाईल असा आश्वासन आ.नमिता मुंदडा यांनी व्यक्त केला आहे.