अंबजोगाई – शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणार्या शिक्षकांना डॉ.राधाकृष्णन शिक्षक स्वयं-सहाय्यता गटाच्या वतीने ‘राष्ट्रीय राधाकृष्णन शिक्षक पुरस्कार – 2024’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा 3 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या समारोहात मूळच्या अंबाजोगाईच्या व हैदराबाद येथील स्थानिक डॉ. अर्चना मुकुंद अचलेरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.अर्चना मुकुंद अचलेरकर ह्या अंबाजोगाई येथील रहिवासी वेदमुर्ती दुर्गादास नारायण पिंगळे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रमेश (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) चे प्रादेशिक संचालक) आणि डॉ. राजीव सिंग (शिक्षक व वक्ता, कवी आणि लेखक, जिल्हा परिषद हायस्कूल, याप्रलचे प्रशिक्षक) उपस्थित होते. तसेच या समारंभात डॉ. राधाकृष्णन शिक्षक सेल्फ हेल्प ग्रुपचे संस्थापक डॉ.अजितकुमार चौहान, सहसंस्थापक भोला सिंग, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष माने, खजिनदार प्रमोद पाल, विपीन तिवारी, नीरज सिंग, आयरा नागराज व इतर अधिकारी उपस्थित होते.