विकास प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद द्या – आ.नमिता मुंदडा यांचे जनतेला नम्र आवाहन
केज:-केज शहरात आ.नमिता अक्षय मुंदडा यांचे विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विकास प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत असे जनतेला नम्र आवाहन केले. केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी शुक्रवारी केज शहरामध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि व्यापारी व केज शहरवासीयांना दिपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहरातील सर्व भागातील व्यापारी बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून त्यांना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान केज शहरामध्ये त्यांना या निवडणुकीसाठी पोषक वातावरण दिसून आले. अनेकांनी त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने फटाके वाजवून त्यांना भरभरून प्रतिसाद ही दिला. सध्या दिवाळीचा सण सुरू आहे तसेच विधानसभा निवडणुकही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केज शहरातील भवानी चौक, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, मेन रोड, सराफ लाईन, टेलर गल्ली, कानडी रोड या भागातील सर्व ठिकाणी डोअर-टू-डोअर जाऊन केज मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी अनेक व्यापारी बांधवांसोबत संवाद साधला, तसेच सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत असे नम्र आवाहन आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केले आहे. यावेळी केज शहरातील नागरिक, छोटे मोठे व्यावसायिक आणि व्यापारी आदी बांधवांशी विकास कामांच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान व्यापारी बांधवांकडून ठिकाठिकाणी आ.नमिताताई यांचे उत्साहात सहर्ष स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या सोबत नेताजी (पापा) शिंदे, सुनिल आबा गलांडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी, सचिव सुहास चिद्रवार, केज तालुका भाजपा अध्यक्ष भगवान केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वसुदेव नेहरकर, अतुल इंगळे, खदिर कुरेशी, प्रकाश मुंडे, शिवाजीराव पाटील, संजय गुंड, मुबीन भाई, रफिक इनामदार, जैनु काझी, मुन्ना शिंदे, संतोष जाधव, दस्तगीर भाई, डॉ.पवार, शिवाजी जाधव, दत्ता सावंत, विकास जाधव, अर्जुन बनसोडे यांचेसह अनेक व्यापारी बांधव, भाजपा महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केज शहरात विविध ठिकाणी त्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले आहे.