भाजपच्या पहिल्या यादीत आ.नमिता मुंदडा यांचा समावेश
अंबाजोगाई:-भारतीय जनता पक्षाचे महासचीव यांच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या ९९ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या यादीत केज विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आ.नमिता मुंदडा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.आ.नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहिर होताच केज मतदार संघातील अंबाजोगाई केज येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व मुंदडा समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी आनंदोत्सव साजरा केला.
केज विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून नमिताताई अक्षय मुंदडा यांची उमेदवारी जाहीर होताच नमिता मुंदडा यांच्यावर समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव.!
केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांनी भाजपाचे अनधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली व विजय संपादन केला. २०१९ ते २००४ अशी पाच वर्षे त्यांनी केज विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.आपल्या आमदारकीच्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनात आपल्या लहान मुलीला घेऊन जाणा-या पहिल्या आमदार म्हणून त्या संपुर्ण महाराष्ट्रात सर्वपरिचित झाल्या होत्या.अधिवेशन कार्यकाळात मतदार संघाच्या विविध विकासासाठी त्यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची राज्यशासनाने दखल घेतली होती.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात त्यांनी केज विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. केज विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधी पैकी पाच वर्षांत सर्वात जास्त निधी आणणा-या आमदार म्हणून त्यांची नोंद झाली आहे. दि २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत आ. नमिता मुंदडा यांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षात केज मतदार संघात कोट्यावधी रुपयाची विकास कामे
केज विधानसभेच्या लोकप्रिय आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात सर्व समावेशक अशा विकास कामांसाठी वेगवेगळ्या फंडांच्या आणि योजनेच्या माध्यमातून अक्षरशा विकास कामांचा पाऊस पडला आहे, केज मतदार संघाच्या विकास कामाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी ओढून आणण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा पुन्हा निवडून येण्याचा मार्ग सोयस्कर झाला आहे.