राज्यात आजपासून आचारसंहिता लागू
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून दिनांक 20 नोव्हेंबरला रोजी मतदान होणार असून 23 रोजी निकाल निकाल लागणार आहे.
2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसर्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसर्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल-
महायुती-162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019मध्ये असे होते संख्याबळ
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288