अंबाजोगाई :-केज मतदारसंघातील अंबाजोगाई आणि केज या तालुक्यात गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी डॉ.अंजलीताई घाडगे यांनी झंझावाती जनसंपर्क दौरा करून दोन्ही तालुके पिंजून काढले आहेत.सध्या प्रत्येक गावात नागरिकांकडून डॉ.अंजलीताई यांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. यावरून केज मध्ये यावेळी परिवर्तन होऊन डॉ.अंजलीताई यांच्या माध्यमातून तुतारी वाजणार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ.घाडगे यांनी केज विधानसभा मतदारसंघात गुरूवारी अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. यात अंबाजोगाई येथील सर्वज्ञ दासोपंत मंदिर देवघर येथे दर्शन घेतले. तसेच सुप्रसिद्ध वक्ते विकास कुलकर्णी यांच्या वक्ता दशसहस्त्रेषु वकृत्व विकास अकादमीला सदिच्छा भेट दिली. तसेच त्यांनी केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली, देवगाव, येवता, विडा, लव्हुरी, कानडी माळी या गावांचा दौरा केला. या प्रसंगी दहिफळ वडमाऊलीचे पंचायत समितीचे माजी सभापती पिंटूभैय्या ठोंबरे, येवता गावच्या सरपंच जोगदंड, विडा गावचे सरपंच पटाईत, लव्हुरी गावचे सरपंच चाळक यांनी अंजलीताईंच्या संपर्क दौऱ्यानिमित्त स्वागत केले असता, गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सोबत कपिल मस्के, शितलताई लांडगे, पत्रकार गौतम बचुटे व रणजीत घाडगे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेत अहोरात्र त्या फिरत आहेत. त्यांना गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गुरूवारी ही त्यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केले. तसेच प्रत्येक गावांमध्ये जाऊन युवती, महिला, भगिनींशी ही डॉ.अंजलीताई या संवाद साधत आहेत. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या भव्य सत्कारामुळे डॉ.अंजलीताई भारवलेल्या पहावयास मिळाल्या, केज विधानसभा मतदारसंघात डॉ.अंजलीताई यांचे जंगी स्वागत होत आहे. तसे तर केज मतदारसंघ हा कायम कॉंग्रेस व शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या उमेदवाराचा बालेकिल्ला राहीलेला आहे. १९९५ नंतर भाजपाला मतदानरूपाने कायम साथ देणारी अनेक गावे केजमध्ये तयार झाली. परंतु, डॉ.अंजलीताईंना मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादावरून भाजपाचे पारंपरिक मतदार असलेल्या या पट्ट्यात सध्या बदलाची हवा दिसून येत आहे एवढे मात्र नक्की.