अंबाजोगाई:-महात्मा गांधी यांच्या बद्दल पसरवल्या गेलेल्या सर्व गैरसमजांना पुराव्या सह उत्तर देणारे तरुण तडफदार लेखक चंद्रकांत झटाले यांचे 15 ऑक्टोबर, मंगळवार रोजी आंबाजोगाई येथे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी सायं 5 वाजता, आधार मल्टीस्टेट, जिजामाता कॉलनी येथे हे व्याख्यान होईल.
अकोल्याचे चंद्रकांत झटाले यांचे ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे पुस्तक बरेच गाजले आहे. त्यांनी गांधीजीवरील शेकडो पुस्तके वाचली व अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यातून पुराव्यांसह जे सत्य समोर आले, ते साध्या-सरळ भाषेत नवीन पिढीपर्यंत पोहोचावे याकरिता त्यांनी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे पुस्तक लिहिले. पुस्तकाची भाषा अगदी साधी-सोपी, सरळ मनाला भिडणारी आणि संदर्भयुक्त आहे. ‘स्वयं घोषित देशभक्तांचे वास्तव’ हे त्यांचे दुसरे पुस्तक आज चर्चेत आहे. ‘महात्मा गांधी-वास्तव आणि विपर्यास्त’ या विधयावर ते बोलणार आहेत.
पुरस्कार वितरण
आंतरभारती आंबाजोगाई तर्फे दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार यंदा शरद लंगे यांना जाहीर झाला आहे. त्या पुरस्काराचे वितरण चंद्रकांत झटाले यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती अमर हबीब (मार्गदर्शक) प्रा. डॉ. शैलजा बरुरे (अध्यक्ष) व संतोष मोहिते (सचिव), अनिकेत डिघोळकर (सहसचिव), महावीर भगरे (कोषाध्यक्ष) यांनी दिली.