शहरी व ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
केज:-डॉ.अंजलीताई घाडगे यांच्या झंझावाती जनसंपर्क दौऱ्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. नागरिक जागोजागी घाडगे यांचा सत्कार करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक वर्ग थेट संवाद साधत आहेत हे विशेष होय.
केज विधानसभा मतदारसंघातील अंबिल वडगाव (ता.जि.बीड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. आणि येथील विकास विषयक कामाची माहिती घेतली. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने डॉ.अंजलीताई यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सन्माननीय सदस्य उपस्थित होते. यासोबतच ताईंनी सावंतवाडी, अंधापुरी, बाळापुरी, सात्रापोत्रा या केज विधानसभा मतदारसंघातील या गावांना देखील भेट दिली. या भेटी दरम्यान गावकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक वर्ग आणि लोकप्रतिनिधी यांनी उत्साहात प्रतिसाद दिला. तसेच अंबाजोगाई शहरानजीक नागझरी परिसरातील ‘जनजागृती नवरात्र महोतसव’ या ठिकाणी डॉ.अंजलीताई घाडगे यांनी भेट देऊन या देखण्या सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच उपस्थितांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या सोबतच त्यांनी अंबाजोगाई येथे ‘किरण भालेकर मित्रपरिवार’ आयोजित ‘व्यंकटेश दांडिया महोत्सव’ या सोहळ्यास भेट दिली. यावेळी अंजलीताईंच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांनी डॉ.अंजलीताई सहर्ष यांचे स्वागत केले. त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघातील नेकनूर येथे जाऊन युवकांनी उद्योगी होऊन आपली प्रगती साधावी आणि देशाच्या विकासात भर घालावी असे प्रतिपादन डॉ.घाडगे यांनी केले. त्यांनी नेकनूर येथील साई गिफ्ट व मॉल या शॉपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जनसंपर्क दौऱ्यानिमित्त डॉ.अंजलीताई घाडगे यांनी नेकनूर येथील साई गिफ्ट व मॉल या शॉपचे दुकानमालक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल मुळे, आकाश मुळे, रोहन मुळे, ज्ञानेश्वर मुळे हे उपस्थित होते. तर केज येथील हॉटेल सातबारा अंबाजोगाई रोड केज येथे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्या. जागोजागी डॉ.अंजलीताई यांना शहरी व ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद व आशिर्वाद लाभत आहे.