निबंध स्पर्धेत अंबाजोगाईत ३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
अंबाजोगाई -: जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला.असे प्रतिपादन आ. नमिता मुंदडा यांनी केले. अंबाजोगाई येथे भगवान महाविर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या निबंध स्पर्धेत तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून आ.मुंदडा बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर शासकीय जिल्हा समिती सदस्य रक्षा धनराज सोळंकी,सविता मुथा, किरण सोळंकी,सोनाली कर्णावट,वर्षा बडेरा, संगीता मुथा, सिनर्जी शाळेचे मुख्याध्यापक भूषण गवाली,तुषार जोशी,शैलेश कंगले यांची उपस्थिती होती.
अंबाजोगाई तालुक्यासाठी 30 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा अंबाजोगाई तालुक्यातील ९ शाळेत घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्हास्तरावर करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.