अंबाजोगाई – तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान विद्यालयातील शिक्षक अरवींद घाटूळे यांचा मुलगा डॉ. महेश अरवींद घाटूळे हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आला आहे. ग्रामीण भागात राहणारे डॉ. महेश घाटूळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षात होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात महाराष्ट्र प्रशासनातील वर्ग १ व वर्ग २ पदासाठी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल घोषीत झाला असून, या परीक्षेत तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान विद्यालयातील शिक्षक अरवींद घाटूळे यांचा मुलगा डॉ. महेश अरवींद घाटूळे हा राज्यातून सर्वप्रथम आला आहे. या यशाच्या माध्यमातून तो उपजिल्हाधिकारी बनण्यास पात्र ठरला आहे. यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयजित शिंदे, डॉ. धनंजय काळे यांनी घाटूळे यांच्या घरी जाऊन सत्कार केला. डॉ. महेश घाटूळे यांनी मिळवल्याच्याबद्दल प्राचार्य प्रा. एन. के. हजारे, प्रा. पी. एस. तरकसे, एस. एन. घुले, व्ही. डी. तट, बी. यु. औताडे, जे. पी. काकडे, एस. व्ही. देशमुख, बी. डी. उगले यांच्यासह जयकिसान विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.