बीड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व मा. श्री. आनंद एल. यावलकर साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 28 सप्टंेबर 2024 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण 1296 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातुन न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण 8259 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 461 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर दाखलपुर्व प्रकरणामध्ये एकूण 48801 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 835 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकूण 1296 प्रकरणे निकाली निघाली आहेत व यामध्ये 15 कोटी 25 लाख 41 हजार 10 रू. एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत. सदरील लोक न्यायालयाच्या प्रसंगी मा.आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, मा. श्री. जी. जी. सोनी साहेब, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह, मा. श्री. व्ही.एच.पाटवदकर साहेब, जिल्हा न्यायाधीश -2, तसेच इतर पॅनल प्रमुख, बीड जिल्हा वकील संघाचे प्र. अध्यक्ष तथा उपाध्यक्ष मा. अॅड. नितीन वाघमारे यांच्यासह वकील संघाचे सर्व पदाधिकारी जिल्हा सरकारी वकील व सर्व सरकारी अभियोक्ता यांची लोकन्यायालयात प्रमुख उपस्थिती होती. तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.
बीड जिल्हयातुन 1296 प्रकरणे लोकन्यायालयामध्ये निकाली

Leave a comment