दर्जेदार पीक उत्पादनाचा महाविद्यालयाचा दावा
अंबाजोगाई प्रतिनिधी:-तुर पीकात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या दोन जातींचा संकर घडवून आणून तूर पीकात नवीन वाण निर्माण करण्यात आलेल्या “रेणुका” जातीच्या प्रक्षेत्रास ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी नुकतीच भेट दिली. अतिशय सशक्त पध्दतीने वाढलेल्या या परीक्षांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनाचा दावा यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बंटेवाढ यांनी केला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत
तुर संशोधन केंद्र, बदनापूर येथे कार्यरत असलेले संशोधक शास्त्रज्ञ डॉ.दिपक पाटील व त्यांच्या टीम ने बीएसएमआर ७३६ आणि
एक्सआयसीपी ११४८८ या वाणाच्या संकरातील संशोधनातुन बिडीएन २०१३-२ रेणुका या नवीन वाणाची निर्मिती करण्यात आली आहे.
सदरील रेणुका वाणाची येथील कृषी महाविद्यालयाने २४ जून २०२४ रोजी १.२० हेक्टर प्रक्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. या नवीन रेणुका वाणांचा परीपक्व कालावधी १६५ ते १७० दिवस (मध्यम कालावधीचा) असून १०० दाण्याचे वजन ११.७० ग्रॅम एवढे आहे. या वाणात प्रथीनांचे प्रमाण २६.६८ टक्के आहे. तर रेणुका वाणाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी १९ ते २२ क्विंटल एवढे असणार आहे.तूर पिकातील सर्व वाणांमध्ये उच्च उत्पादन क्षमता, मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम हे या वाणाची ठळक वैशिष्ट्ये राहणार असून या वाणाच्या पीकाच्या फुलांचा रंग पिवळा, शेंगांचा रंग हिरवा तर दाण्यांचा रंग लाल राहणार आहे. मध्य भारतातील शेती जमीन या रेणुका वाणाचे पीक अधिक उत्पादन देणारे ठरेल असा दावा या वाणाच्या निर्मिती करणाऱ्या टीमने केला आहे.
▪️ प्रक्षेत्रावर आश्चर्यकारक पीक उभे
कृषी महाविद्यालयाच्या १.२० हेक्टर प्रक्षेत्रावर घेण्यात आलेले रेणुका वाणाचे तुर पीक अतिशय सशक्तपणे उभे आहे. फुलं निर्मितीच्या प्रक्रियेत असलेले हे पीक साडेचार ते पाच फुट उंचीपर्यंत जावून पोहोचले आहे. हिरव्या गर्द पानाला कसल्याही प्रकारची कीड दिसत नसून हे झाड अनेक फांद्यांनी लगडलेले असून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन या प्रक्षेत्रावर मिळेल असा दावा कषी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
▪️मान्यवरांची उपस्थिती
कृषी महाविद्यालयाच्या या रेणुका जातीच्या तूर पलीकडच्या प्रक्षेत्रास भेट देताना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या समवेत मसापचे सचीव गोरख शेंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाढ, प्रक्षेत्र सहाय्यक बालासाहेब चिल्लरगे, ग्रंथपाल कवी राजेश येवले हे मान्यवर उपस्थित होते.