नमिता मुंदडा यांनी केले जलपूजन
अंबाजोगाई -: मांजरा धरण पूर्ण भरल्याने या परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे. तर अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला.दर वर्षी धरण भरले तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. असे प्रतिपादन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.गुरुवारी सकाळी आ. नमिता मुंदडा यांनी धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण भरल्याने या ठिकाणी भेट दिली व जलपूजन केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, शेख रहीमभाई,दिलीपराव भिसे, भगवान केदार,सुनील गलांडे,सारंग पुजारी,संजय गंभीरे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या की मध्यंतरी एक वर्ष धरण न भरल्याने या परिसरात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता या वर्षी चांगला पाऊस पडल्याने व धरण भरल्याने सिंचन व पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. दर वर्षी धरण भरावे अशी प्रार्थना आपण वरुणराजा कडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धरणाचे अभियंता यांच्याशी चर्चा केली. सद्या स्थितीत धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.व नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नदिपात्राच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी खबरदारी बाळगावी. शासनस्तरावर या बाबत सर्व सूचनाही देण्यात आल्याचे आ. नमिता मुंदडा यांनी सांगितले.