महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक ॲड.शंकर चव्हाण
परळी वैजनाथ:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच मंगळवारी बीड जिल्ह्यातील तरूण तडफदार कार्यकर्ते ॲड.शंकर चव्हाण यांनी राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ॲड.चव्हाण यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. खा.पवारांच्या भेटीवेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीकडून आपण स्वतः ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षानेच ही जागा लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत खा.पवार साहेब हे सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा आहे असे ॲड.शंकर चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
मुंबई येथे मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची ॲड.शंकर शेषेराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत ॲड. शंकर चव्हाण यांनी ते स्वतः परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत असे सांगितले. साहेबांनी आपल्या स्वतःच्या सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरी व कार्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पवार साहेबांनी बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि अहवाल ॲड. शंकर चव्हाण यांच्याकडून जाणून घेतला. याप्रसंगी चव्हाण यांनी स्वतःचा अनुभव, केलेले कार्य यांची माहिती साहेबांना दिली. आपण आदरणीय पवार साहेबांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले अशी माहिती ॲड. शंकर चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत असे सांगून याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माझे संपूर्ण नांव ॲड.शंकर शेषेराव चव्हाण आहे. मी विधीज्ञ व उद्योजक आहे. माझे शिक्षण : एलएलबी, एमबीए-एचआर झाले आहे. मी जातीने मराठा आहे. मी व्यवसायाने वकील आहे. माझी स्वतःची आयटी कंपनी आहे. रिअल इस्टेट मध्ये ही आपण काम करीत आहोत. माझे गांव नांदगाव पोस्ट सुगांव, तालुका अंबाजोगाई (जिल्हा बीड) हे आहे व ते परळी विधानसभा मतदारसंघात आहे. आपण संस्थापक : इन्फोडॅड टेक्नॉलालीज प्रा.लि., संस्थापक : दैनिक शिवजागर, (बीड, लातूर), सचिव : विश्वनाथ फाऊंडेशन, नांदगाव, संस्थापक : अपेक्स नेस्ट प्रॉपर्टीज पुणे, संस्थापक : साप्ताहिक जयवंती टाईम्स, बीड आहोत. मी यापूर्वी राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना शेतकरी कामगार पक्ष, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष म्हणून सन २०१५ ते २०१८ कार्यरत होतो. पत्रकारीता क्षेत्रात ही मला अनुभव आहे. पत्रकार म्हणून मी तालुका प्रतिनिधी : दैनिक समर्थ लोकनेता बीड (सन २०१४ पासून २०१५), तालुका प्रतिनिधी : दैनिक मराठवाडा साथी बीड (सन २०१५ पासून २०१६), सचिव : मराठी पत्रकार परिषद, मुंबई शाखा अंबाजोगाई (सन २०१४ ते २०१५), मराठवाडा विभागीय सदस्य : महाराष्ट्र पत्रकार संघ (२०१५ ते २०१६), संपादक जयवंती टाईम्स, २०१६ ते आजतागायत व संपादक शिवजागर, २०१९ ते आजतागायत चालू आहे. मला शासकीय सेवेचा अनुभव आहे. मी मा.जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर दि. ०४.०१.२०१ ते ०३.०८.२०२४ पर्यंत कनिष्ठ लिपीक म्हणून सेवा केली आहे. तर सध्या मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे वकीली करीत आहे. मला २०१५-२०१९ अशी सलग पाच वर्षे राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ज्यात भारतीय पुरस्कार विजेते संघ, शोधपत्रकारीता व सामाजिक न्याय पुरस्कार, मुंबई भांडुप येथे (सन २०१५), पद्मश्री डॉ.मणिभाई राष्ट्रसेवा ऍवार्ड २०१६ व नेहरू युवा केंद्र मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारा ‘पत्रकारीता पुरस्कार’ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक पदमवती पुणे येथे (सन २०१६), अंबाजोगाई पत्रकार संघ (ता.अंबाजोगाई जि.बीड) दर्पण दिनानिमित्त (सन २०१७), पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांती ग्राम विकास संस्था व दैनिक विश्वनायक लोकसंसद यांच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज नेशन पॉवर अवॉर्ड – (सन २०१८) आणि संपादकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची अविरत कार्य केल्यामुळे दैनिक कश्मकश व दिव्य वार्ता यांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त देण्यात येणारा “मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार २०१९” (सन २०१९) प्राप्त झाले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघाचा मला चांगला अभ्यास आहे. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघात माझा मोठा जनसंपर्क व मित्र, परिवार, नातेवाईक आहेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपला विजय पक्का असल्याचे युवा नेते ॲड.शंकर चव्हाण यांनी सांगितले.
तसेच ॲड शंकर चव्हाण यांना परळी मतदारसंघात तरुणांचा फुल सपोर्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळत असून, ‘आमदार हवा तर चेहरा नवा’ अशा स्टेटसचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. तरुण वर्गातून सकारात्मक विचार व विकासात्मक धोरण असणारे ॲड. शंकर चव्हाण असाच लोकप्रतिनिधी म्हणून परळी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हवा आहे असा उत्साहाचा सुर परळी मतदार संघातील जनतेकडून ऐकायला मिळत आहे. एकूणच परळी मतदार संघात ॲड. शंकर चव्हाण यांच्या नावाचीच चर्चा असून त्यांना विधानसेत पाठवण्यासाठी मतदारसंघातील जनतेची पसंती अधिक मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे व परिवर्तनाची लाट सध्या पहावयास मिळत असल्याने नव्या चेहऱ्यांनाच जनता निवडुन देणार असल्याचं ठाम असल्याचं चित्र यावरुन लक्षात येतं.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे ॲड.शंकर चव्हाण यांनी मागितली परळी विधानसभेची उमेदवारी..!

Leave a comment