अंबाजोगाई:-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडाधिकारी बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गढी येथील शिवशारदा पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या 19- वर्षे वयोगटात गोदावरी कुंकूंलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.या संघात निकीता माने ,शिवानी हारे , प्रतिक्षा मोरे, सार्थी रोडगे, तेजल इंगळे, आनंदी माने, कृष्णाई प्रजापती , अंजली पवार , विशाखा जाधव, अंजली कुसळे, ऋतुजा भताने , शर्वरी जळकोटकर, शर्वरी मुंडे यांचा समावेश होता. खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडाविभाग प्रमुख अंजली रेवडकर
यांनी केले .विजयी खेळाडूंचे अभिनंदन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुरेश खुरसाळे, चंद्रशेखर बर्दापूरकर,
गणपत व्यास ,जगदीश चौसाळकर, कमलाकर चौसाळकर, प्रा .माणिकराव लोमटे, डॉ . शैलेश वैद्य , प्रा . जयश्री मोटेगावकर ,ॲड. कल्याणी विर्धे ,रमण सोनवळकर , मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी,स्मीता धावडकर ,अनिता लोंढे, श्री तोंडाकुरे, देवनंदा सोन्नर ,जिजा गवळे तसेच शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थीनींने केले.
जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धेत योगेश्वरी कन्याशाळेला प्रथम पारितोषिक

Leave a comment