गणेशोत्सवातील मिरवणूक, आरास व महालक्ष्मी आरास देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण
अंबाजोगाई – गणेश मंडळाच्या माध्यमातून अंबाजोगाईची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे काम अनेक गणेश मंडळांनी केले. समाज प्रबोधनाचा वारसा याला कलाकृतीची जोड देवून शहरात उत्कृष्ट देवाव्याची पंरपरा शहरवासीयांनी जोपासली असे प्रतिपादन केज विधानसभेच्या भाजपाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केले. वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण व रोटरी क्लब यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या मिरवणूक देखावा आरास व महालक्ष्मी देखावा आरास या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ.नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्ञानप्रबोधनिचे समन्वयक प्रसाद चिक्षे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे, रोटरी क्लबचे प्रकल्प संचालक शेख शकील बागवान, अभिजीत जोंधळे, प्रा.संतोष मोहिते, सुदर्शन रापतवार, राजेसाहेब किर्दंत, प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, पंजाबराव थारकर, रमण सोनवळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या की, अंबाजोगाईची सांस्कृतिक चळवळ गतीमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर सांस्कृतिक चळवळही राबविण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जुन्या मंदिरांचा पुर्नविकासाबरोबरच राहिलेल्या मंदिरासांठीही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रसाद चिक्षे, अभिजीत जोंधळे, सुदर्शन रापतवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना रूपये 11 हजारांपासून ते 2100 रूपयांपर्यंतचे बक्षीसे सन्मानचिन्ह तर रोटरीच्या वतीने फिरते चक्षक देवून बक्षीसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रकाश बोरगावकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बालाजी शेरेकर यांनी मानले. स्व.गोपीनाथराव मुंडे व स्व.डॉ.सौ.विमलताई मुंदडा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यांना मिळाली पारितोषिके
गणेश देवाखा आरास स्पर्धा – सरस्वती गणेश मंडळ (प्रथम क्रमांक), हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ (द्वितीय), दिपक गणेश मंडळ (तृतीय), ज्ञानप्रबोधिनी गणेश मंडळ (चतुर्थ), योगेश्वरी गणेश मंडळ (पाचवे), श्रीदत्त मंदिर, हौसिंग सोसायटी (उत्तेजनार्थ).
मिरवणूक स्पर्धा
ज्ञानप्रबोधिनी गणेश मंडळ (प्रथम), नगरसंघ गणेश मंडळ (द्वितीय), संगम गणेश मंडळ (तृतीय), हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ (चतुर्थ), महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळ (पाचवे), उदय गणेश मंडळ (उत्तेजनार्थ)
महालक्ष्मी आरास स्पर्धा
आशा लोमटे (प्रथम), आघाव (द्वितीय), आकांक्षा कडबाने (तृतीय), तर उत्तेजनार्थ ललीता टेकाळे, आरती कदम, डॉ.कुंडगे यांना देण्यात आले.